बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून अंबिका सोनींनी नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर

नवी दिल्ली | गुजरात पाठोपाठ पंजाब राज्यातही मुख्यमंत्र्यांनी आपलं पद सोडल्यानं देशात एकच खळबळ उडाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबाचा मुख्यमंत्री कोण असणार? याकडे सर्वांचच लक्ष लागून आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेत्यांची नाव सध्या चर्चेत आहेत. अशातच काॅंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदासाठीची ऑफर नाकारली असल्याची बातमी समोर आली आहे.

अंबिका सोनी यांनी शनिवारी रात्री काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की, पंजाबशी माझं घट्ट नातं असून एका शीख व्यक्तीलाच राज्याचं प्रमुख बनवलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारल्याचं समजंत आहे. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यापदासाठी आता काॅंग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच चुरस लागलेली दिसत आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा, ब्रह्म मोहिंद्रा, विजय इंदर सिंगला त्याचबरोबर खासदार प्रताप सिंह बाजवा या नेत्यांची नाव आघाडीवर आहेत. परंतु, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदासाठीची ऑफर नाकारली आहे. त्यामुळे काॅंग्रेसचा कोणता नेता मुख्यमंत्रीपदाची बाजी मारणार, ते आता पाहवं लागणार आहे.

दरम्यान,  नवज्योतसिंग सिद्धू यांनीही अंबिका सोनी यांना बोलावून मुख्यमंत्रीपदासाठी समजावलं होतं. परंतु त्यांचा काहीच फायदा झाला नाही. हा माझा पंजाब आहे आणि माझ्या राज्यासाठी शक्य ते सर्व केलं आहे. मी गेली 52 वर्ष राजकारणात आहे आणि पुढेही राहणार आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

निष्काळजीपणा जीवावर बेतला, कोरोना टेस्ट करताना किट घशात अडकल्याने महिलेचा मृत्यू

पतीसोबत बहिणीचं अफेअर असल्याचं कळताच पत्नीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘बहुमत चाचणीला तयार राहा’; अमरिंदर सिंग यांचा थेट हायकमांडला इशारा

“20-22 महिने झाले आमच्या एकाही आमदाराला हात लावू शकले नाहीत”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More