बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनामुळे निधन

मुंबई | काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनाने निधन झालं आहे. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. ते माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं. एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता.

दरम्यान, दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.

थोडक्यात बातम्या-

आसाम हादरले! 6.4 रेश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

चिंता वाढली! देशात कोरोना मृ्तांची संख्या 2 लाख पार; रूग्णांसह मृत्युदरही वाढला

‘मोदीजी कृपया राजीनामा द्या…’; कंगणाचं ते ट्विट चर्चेत

‘ज्यांनी लस घेतली, त्यांनी मास्क लावायची गरज नाही’; ‘या’ देशाची मोठी घोषणा

केंद्र सरकार ‘या’ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत; आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More