Top News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं आज निधन झालंय. ते 93 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आहे.

प्रकृती खालावली असल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

यापूर्वी त्यांना कोरोनाची देखील लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेतले असता त्यांनी कोरोनावर मातही केली होती.

मोतीलाल वोरा यांनी काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याचप्रमाणे ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री देखील होते.

थोडक्यात बातम्या-

युकेमधून येणाऱ्या विमानांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

शरद पवार जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असतील तर…; फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

“ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी राममंदिर वर्गणीला टार्गेट करणं स्वाभाविकच”

‘…तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता’; निलेश राणेंची जहरी टीका

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या