बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ट्विटरस्पेसच्या माध्यमातून करणार मुक्त गप्पा

मुंबई | राजकीय नेते तसेच मंत्री आता तंत्रज्ञानाशी अवगत होत आहेत. तसेच काहीजण हे अगोदरपासूनच तंत्रस्नेही असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आता पृथ्वीराज चव्हाण हे आता ट्विटरच्या एका नव्या फिचरच्या माध्यमातून नागरिकांशी मुक्त संवाद साधणार आहेत.

मराठी ट्विटरस्पेसच्या माध्यमातून काँग्रेस नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे रविवारी 13 जून रोजी रात्री 09 ते 10:30 या वेळेदरम्यान ट्विटरवर नागरिकांशी मोकळेपणाने गप्पा मारणार आहेत.

राजकीय नेते मोकळेपणाने नागरिकांशी संवाद साधताना खूप कमी वेळा पाहायला मिळतात. त्यातच पृथ्वीराज चव्हाण हे मुक्तपणाने संवाद साधणार असल्याने हा संवाद कार्यक्रम नक्कीच चांगल्या रीतीने पार पडेल यात शंका नाही. शिवाय नागरिकांच्या प्रश्नाला पृथ्वीराज चव्हाण देखील मोकळेपणाने उत्तरं देतील.

@Liberal_India1 या ट्विटर अकाउंटवरून पृथ्वीराज चव्हाण हे उद्या महाराष्ट्रातील जनतेशी मुक्त गप्पा करतील. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर दिलेल्या अकाउंटच्या ट्विटरस्पेसमध्ये सामील होऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी नागरिक संवाद साधू शकतात.

थोडक्यात बातम्या –

आता लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही; राजेश टोपेंची मोठी घोषणा

‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल’; पवारांच्या निवडणूक एकत्र लढण्याच्या वक्तव्यावर पटोलेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 24 तासात फक्त 2 जणांचा मृत्यू, तर नव्या 15 बाधितांची नोंद

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

“सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेचं लोणी खाणं बरं वाटतं का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More