बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांची प्राणज्योत मालवली, उद्या होणार अंत्यसंस्कार

पुणे | काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं वयाच्या 72 व्या वर्षी पुण्यात निधन झालं आहे. गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर पुण्यातील जोशी खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. शरद रणपिसे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहे.

शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर शरद रणपिसे यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर शरद रणपिसे यांचं निधन झालं. शरद रणपिसे यांच्या निधनामुळे काॅंग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असुन एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. काॅंग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असं ट्विट महाराष्ट्र काॅंग्रेसने केलं आहे.

पुणे महापालिकेचे सदस्य म्हणून राजकीय प्रवासाला आमदार शरद रणपिसे यांनी सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांची निवड विधान परिषदमध्ये करण्यात आली. विधान परिषद आमदार ते थेट विधिमंडळातील काॅंग्रेसचे महत्वाचे नेते असा त्यांचा प्रवास राहिला आहे. पुढे शरद रणपिसे यांनी विधान परिषदेचे काॅंग्रेसचे गटनेते म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.

दरम्यान, सामाजिक क्षेत्रात काम करताना रणपिसे यांनी ‘रामराज्य शिक्षण संस्था’ स्थापन केली होती. त्याचबरोबर ते ‘उर्दू नगर शिक्षण संस्था’ आणि ‘महाराष्ट्र युथ वेल्फेअर’ फाऊंडेशनचे ते संस्थापक देखील होते.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे नंतर पुढचा जन्म रस्ते काॅन्ट्रॅक्टरचा मिळू दे- हेमंत ढोमे

ठेच लागता पायी, वेदना होई तिच्या ह्रदयी! लेकराला मृत्यूच्या दारातून आणलं परत, पाहा व्हिडीओ

”अनंत गीतेंची जी अवस्था आहे तिच शिवसैनिकांची आहे, त्यांना कोणी विचारत नाही”

मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं- किशोरी पेडणेकर

”आमचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास, ते आमचा मान ठेवतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More