बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं दुःखद निधन

कोल्हापूर | शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे दुःखद वातावरण झालं आहे.

कोल्हापूरात उपचारादरम्यान एन. डी. पाटील यांचं निधन झालं. वयोमानामुळे उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. सामाजिक, राजकीय जीवनात सर्वसामान्यांसाठी त्यांनी अनेक कामं केली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणंही बंद झालं होतं. मागच्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेलं नव्हते. सध्या एन. डी. पाटील यांच्या जाण्यानं सगळीकडे शोककळा पसरली आहे.

थोडक्यात बातम्या – 

सोनं-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा आजचे ताजे दर

राजकारण तापलं: महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राणा दाम्पत्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी

‘…कच्च्या गुरूचा चेला नाय मी’; महिलांसोबत गैरवर्तणाच्या आरोपांवर किरण मानेंची प्रतिक्रिया

किरण माने प्रकरण: “महिलांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढलं”

Omicron मधून बरं झाल्यानंतर शरिरात ‘इतका’ कालावधी अँटीबॉडीज राहतात, तज्ज्ञांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More