बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार डाॅ. अनिल अवचट यांचं निधन

मुंबई | ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं सध्या सगळीकडे शोककळा पसरली आहे.

अनिल अवचट यांचं दिर्घ आजारानं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. साहित्य क्षेत्रामध्ये अनिल अवचट यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांचं हे योगदान कायम आठवणीत राहणारं आहे.

याशिवाय व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी डाॅ. अनिल अवचट यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती.

दरम्यान, आज दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.

थो़डक्यात बातम्या –  

“लोकांना येडं बनवण्याचं काम चालूये”, चंद्रकांत पाटलांची अजित पवारांवर खोचक टीका

मुंबईत मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरू

दरीत अडकलेल्या ट्रकचा थरारक व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

Corona Update: पुण्यात ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद, वाचा आजची आकडेवारी

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More