BCCI l IPL 2025 ची धूम सुरु असतानाच भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) सिनिअर वूमन्स मल्टी डे चॅलेंजर ट्रॉफी 2025 ची घोषणा केली आहे. 25 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी 4 संघांची निवड करण्यात आली असून, एकूण 6 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि अभिमन्यू क्रिकेट अकादमी येथे होणार आहेत.
स्पर्धेचं वेळापत्रक:
25 ते 27 मार्च: टीम A vs टीम B
25 ते 27 मार्च: टीम C vs टीम D
31 मार्च ते 2 एप्रिल: टीम A vs टीम C
31 मार्च ते 2 एप्रिल: टीम B vs टीम D
6 ते 8 एप्रिल: टीम A vs टीम D
6 ते 8 एप्रिल: टीम B vs टीम C
BCCIने जाहीर केलेले संघ:
टीम A:
मिन्नू मणी (कर्णधार), अरुंधती रेड्डी (उपकर्णधार), रिचा घोष, शिप्रा गिरी, शुभा सतीश, श्वेता सेहरावत, वृंदा दिनेश, मुक्ता मगरे, हेन्रिएटा परेरा, तनुजा कंवर, वासवी ए पवानी, प्रिया मिश्रा, सायली सातघरे, अनादी तागडे, प्रगती सिंग.
टीम B:
हरलीन देओल (कर्णधार), यास्तिका भाटिया (उपकर्णधार), एम. ममथा, प्रतिका रावल, आयुषी सोनी, आरुषी गोयल, कनिका आहुजा, मीता पॉल, श्री चरणी, ममता पासवान, प्रेमा रावत, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, अक्षरा एस, तीतास साधू.
टीम C:
जेमिमा रॉड्रिग्स (कर्णधार), शफाली वर्मा (उपकर्णधार), उमा चेत्री, रिया चौधरी, तृप्ती सिंग, तनुश्री सरकार, तेजल हसबनीस, सुश्री दिव्यदर्शनी, सुची उपाध्या, राजेश्वरी गायकवाड, सरन्या गडवाल, जोशिता व्हीजे, शबनम एमडी, सायमा ठाकोर, गरिमा यादव.
टीम D:
स्नेह राणा (कर्णधार), अमनजोत कौर (उपकर्णधार), नंदिनी कश्यप, शिवांगी यादव, जी त्रिशा, जिन्सी जॉर्ज, राघवी, धारा गुजर, संस्कृती गुप्ता, यमुना व्ही राणा, वैष्णवी शर्मा, एसबी कीर्थना, काशवी गौतम, मनाली दक्षिणी, मोनिका पटेल.