बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत आमदाराच्या पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ, ‘हे’ दिलं कारण!

मुंबई | मुंबईत एका आमदाराच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे.

शनिवारी सकाळच्या सुमारास एका दुचाकी वाल्याने पोलिसांनी एक महिला ब्रीजच्या कठाड्यावर चढली असून ती रडत असल्याची माहिती दिली. वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल ढगे यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द पोलीस स्टेशन तसंच नवी मुंबई पोलिसांना घटनेची माहिती दिली.

ढगे यांनी संबंधित महिलेशी बोलत त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. त्यानंतर त्या महिलेला मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. तिथे आणल्यावर महिलेची चौकशी केली असता आपण आमदराची पत्नी असल्याचं सांगितलं.

दरम्यान, आत्महत्या करण्याचं कारण विचारल्यावर त्यांनी, कौटुंबिक वादामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं सांगितलं. या चौकशीनंतर त्यांनी आमदाराची पत्नी सांगणाऱ्या महिलेला नवी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आलं. मात्र महिला नेमकी कोणत्या आमदाराची पत्नी होती, याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली  नाही.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

‘…अन् भर रस्त्यात मलायकाला रोखलं आजोबांनी’; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा रक्तसाठा तिपटीने वाढला

‘…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईल- संभाजीराजे भोसले

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या खाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More