बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हप्ते गृहमंत्र्यांना पोहोचवावे लागतात…’; सराफाने पोलीस निरीक्षकावर केलेल्या आरोपांनी खळबळ

सोलापूर | सोलापुरातील सराफाने पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ माजली आहे. गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप सराफ व्यावसायिक अमृतराव गुगळे यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी सराफ व्यावसायिकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. तरीपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने चांगमल ज्वेलर्स हे आपलं सोन्याचं दुकान सुरु ठेवलं होतं. राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांचं दुकान सील केलं.

बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे. अमृता अमृतराव गुगळे यांनी सराफ दुकान उघडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतराव गुगळे यांचे सराफ दुकान चालू असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केली, असं स्पष्टीकरण पोलीस निरीक्षकांनी दिलंय.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. तसेच या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरू आहे.

थोडक्यात बातम्या- 

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचं पालन अशक्य- अमित शहा

औरंगाबादेत PSI आणि महिला हवालदाराचं सूत जुळलं, पत्नीसोबत केलं लज्जास्पद कृत्य

महिलेवर 11 जणांनी केला बलात्कार, त्यानंतर समोर आली धक्कादायक माहिती

माणसातला देव! रोज 200 ते 300 टन ऑक्सिजन पुरवण्यासा सुरूवात

जेसीबीचा दात मानेत घुसला आणि… काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More