बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ

अहमदनगर | ‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या अजिंक्य गायकवाडचा मृत्यू झाल्यानं सध्या महाराष्टरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अहमदनगर येथे अजिंक्यला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना घरामध्येच घडल्याचं समजतंय. घरातील टीव्ही व्यवस्थित चालत नसल्यानं अजिंक्य टीव्ही केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्यानं अजिंक्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे अजिंक्य गायकवाडचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अजिंकच्या अकाली मृत्यूनं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2019 साली अजिंक्य गायकवाडनं ‘मिस्टर वर्ल्ड’ या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्या अकाली जाण्यानं मित्र परिवार, त्याच्या फाॅलोवर्सला मोठा धक्का बसला आहे. ही घटना केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे झाल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –   

FD करण्याचा विचार करताय?, थांबा, ‘या’ पर्यायांचा विचार करा आणि मालामाल व्हा!

कोव्हिशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात महत्वाची बातमी; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मोठी मागणी

“उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”

लहान भाऊ शेततळ्यात पडला, थोरला वाचवायला गेला, पण नियतीच्या मनात वेगळं होतं!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More