पंकजा मुंडेंबाबत भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा!

जालना | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. तसेच पंकजा मुंडे भाजप सोडणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. आता पंकजी मुंडेंच्या नाराजीबच्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला होता. कारण पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे या कृतीने त्यांचा अपमान झाला असं समजणं हे हस्यास्पद आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, क्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत आहेत. भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारं एक युनिट आहे. तेच हे काम करत आहे, असा धक्क्दायक खुलासा बावनकुळे यांनी केलाय.

कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी कबुलीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-