Mumbai | माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांची 2006 साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली. प्रमोद महाजन यांची हत्या गृहकलहामधूनच झाल्याची त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा होती.
प्रमोद महाजनांसंदर्भात खळबळजनक दावा
आता या घटनेला 18 वर्ष झाली. पण प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन आणि त्यांची लेक पूनम महाजन यांनी केलेल्या वक्तव्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दोघांच्या खळबळजनक दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अठरा वर्षानंतर प्रमोद महाजन ( Pramod Mahajan) यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत चर्चा सुरू झाली.
“Pramod Mahajan यांच्या विरोधात मोठं षडयंत्र होतं”
प्रमोद महाजन यांची कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी वडिलांची हत्या ही कौटुंबिक विषय किंवा द्वेष भावनेपोटी नव्हती, असा दावा केला. ते एक मोठं षडयंत्र होतं, असा दावा माध्यमांशी बोलताना केलाय.
पूनम महाजन यांनी म्हटलं की, माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हा हा कौटुंबिक विषय असल्याचं चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची राजकीय कारकीर्द पुढे जाऊ नये, यासाठी षडयंत्र होते. त्यांना रोखण्यासाठी संपवण्यात आले. एवढेच नाहीतर माझे लोकसभेच्या वेळी तिकीटही कापण्यात आलं. तेही एक मोठं षडयंत्र होतं. पण हे षडयंत्र कोणी रचलं? हे असं कोणी का केलं? याच्या शोधात मी बसत नाही. मात्र, हे षडयंत्र आज नाही तर उद्या एक दिवस बाहेर येईल, असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे प्रकाश महाजन म्हणाले की, “‘माझ्या भावाच्या हत्येचं षडयंत्र रचणाऱ्या व्यक्तीचा मी जीव घेईन, षडयंत्र रचणारी व्यक्ती पोलादी पडद्याच्या आत आहे. षडयंत्र ज्या व्यक्तीनं केलं त्याच्यामुळे मी माझे दोन भाऊ गमावले. ती व्यक्ती मला माझ्या हयातीत भेटली, तर एक तर ती व्यक्ती राहील नाहीतर मी राहीन, असं त्यांनी म्हटलंय.
प्रमोद महाजन यांनी हे सर्व कष्टाने कमावले होते. पण माझ्या धाकट्या भावाच्या मेंदूवर नियंत्रण मिळवून हे कृत्य त्याला करायला लावले. हे षडयंत्र करायला लावणाऱ्या व्यक्तीला मी काय फुलांचे हार देईन का? हे षडयंत्र बाहेर येऊ नये म्हणून घरातील माणसालाच हे कृत्य करायला लावले, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर खोचक शब्दात टीकास्त्र!
बंडखोरांना दणका! कॉँग्रेसकडून बड्या नेत्याच्या मुलासह ‘या’ बंडखोरांचं निलंबन
संजय राऊत माविआचे xxx, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते…
मुंडे बहीण भावावर प्रवीण महाजनांच्या पत्नीचा अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
‘ज्यांची घरं बुलडोझरने पाडली त्यांना…’; सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला मोठा झटका