बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक असेल, अशा आशयाची टीका देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी केली आहे. याला आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरुदन होतं. माझा त्यांना सवाल आहे की आम्ही तर कायदेशीररीत्या निवडून आलो आहोत. मात्र जेव्हा आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठित तुम्ही खंजीर खुपसला, तेव्हा तुम्ही राजीनामे का नाही दिले? तेव्हा का नाही निवडणुका घेतल्या?, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

तुम्ही तिघांनी मिळून 2019 लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकला नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

ते भाषणात असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक ठरेल. मी त्यांना एवढंच सांगतो, की मुद्दई लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में होता है, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

हिंमत होती, तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं होतं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं होतं. त्यामुळे मला वाटतं की कालचं त्यांचं भाषण निराशेचं भाषण होतं, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता पण तुम्ही तर…’; एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला आणखी एक झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More