बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हॅलो, मी शरद पवार बोलतोय! ‘त्या’ नकली फोन कॉलमुळे मंत्रालयात खळबळ

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या नावानं मंत्रालयात फेक फोन कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीचा मंत्रालयात फोन आल्यानं प्रशासकीय अधिकारीही थोडा वेळ चक्रावून गेले. संबंधित व्यक्तिने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलुन फोन ठेऊन दिला. त्यानंतर लगेचच या प्रकरणाची तपासणी करण्यात आली आणि दोघांना ताब्यात घेण्यात आलं.

हॅलो, मी सिल्वर ओकमधून शरद पवार बोलतोय, असा शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढत अज्ञात व्यक्तिने मंत्रालयात फोन केला. त्या व्यक्तिने प्रशासकीय बदल्यांसंबधित चर्चा केल्याची मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याची माहिती समजत आहे. तसेच काही जमीन व्यवहारांबाबत शेरा मारण्यास त्या व्यक्तीनं सांगितलं असल्याचं समजतंय.

त्या व्यक्तीविरोधात मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. तर पुढील प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखाकडे ही तक्रार देण्यात आली.

दरम्यान, चाकणमधल्या प्रतापराव वामन खंडेभारड व्यक्तिलाही जमीन प्रकरणाबाबत शरद पवारांच्याच आवाजात फोन केला होता. त्या व्यक्तीकडून त्यांच्या संबंधित व्यवहारात अडकलेल्या पैशाची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच शरद पवारांची जाणुनबुजून बदनामी करण्याचा प्रयत्न आहे की काय? असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.

थो़डक्यात बातम्या-

“संसदेमध्ये महिला सदस्यांना धक्काबुक्की ही तर ‘गुजरात मॉडेल’ ची प्रतिकृती”

रक्षाबंधनाच्या अगोदर नरेंद्र मोदींनी महिलांना दिलं हे खास गिफ्ट; केली मोठी घोषणा!

“राज्य सरकारच्या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना जनता त्रासली आहे”

“इंग्रजांनी भारताची लूट केली, त्यांच्यावरचा राग अजूनही डोळ्यात माझ्या सलत आहे”

“घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More