बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेन्सेक्सची नवी भरारी! सणासुदीला शेअर बाजार उच्चांकावर; गुंतवणूकदारांची चांदी

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजार उसळी घेताना दिसत आहे. कोरोना काळात शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण झाली होती. मात्र, आता कोरोना आटोक्यात आल्यानंतर आत पुन्हा शेअर बाजार तेजीत असताना दिसत आहे. तर जागतित बाजारात देखील उचल घेतल्यानं त्याचा परिणाम भारतीय बाजारात होत आहे. त्यातच आता कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठल्याचं पहायला मिळालं.

आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाली. आज सेन्सेक्सने 1 टक्क्यांची वाढ घेतली. सेनसेक्स 590 अकांंनी वाढल्याचं पहायला मिळालं. त्याचसोबतच सेन्सेक्सने सर्वाकालिन उच्चांक गाठला आहे. सध्या सेन्सेक्स 56,704 वर स्थिरावला आहे. निफ्टी देखील 16,800 वर आला आहे. नेफ्टीत देखील 1 टक्क्याची वाढ झाल्याची वाढ झाली आहे.

टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि टायटन हे सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढलेले दिसत आहे. या कंपन्या 2 टक्क्यांहून अधिक वाढल्या. तर महेंद्रा अँड महेंद्रा, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व, एल अँड टी आणि एशियन पेंट्सचे शेअर्स वाढले आहेत.

दरम्यान, सेन्सेक्स बरोबरच मिड कॅपमध्ये देखील सलग 5 दिवस वाढ झाली. मिडकॅप इंडेक्स 23613 वर पोहचला आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांची चांदी झाल्याचं पहायला मिळतंय. देशात पुन्हा कोरोना वाढू लागल्यानं शेअर्स पडतील अशी चिंता व्यक्त केली जाती. मात्र, सणासुदीच्या दिवशी शेअर बाजारात वाढ झाल्याचं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून करता येणार ‘आयफोन 13’ची बुकिंग

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

अनिल देशमुखांना क्लिनचीट? सुप्रिया सुळे म्हणतात…; पाहा व्हिडीओ

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन; नियम मोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न

ईडीच्या नोटीस नंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…; पाहा व्हि़डीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More