बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचं बंड! म्हणतो, “माझ्यासाठी ती खासगी गोष्ट, मी सांगणारच नाही”

मुंबई | कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगभरातील लोकांना बसला आहे. कोरोनाचा धोका अदयापही कमी झालेला नसून अशातच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांचं करण्यात आलं आहे. जगातील प्रसिद्ध टेनिसपटूने लसीकरणाबाबत माहिती देण्यास नकार दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा होत आहे. त्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंची स्टेट ऑफ व्हिक्टोरीयाकडून लसीकरणाबाबत माहिती घेतली जात आहे. लसीकरण झालं की नाही, याबाबत माहिती देण्यास सांगितलं. तेव्हा सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जोकोव्हिच मेलबर्न याठिकाणी होणाऱ्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला मुकाण्याची शक्यता आहे.

मला अजूनही काहीही माहिती नाही, की मी मेलबर्न याठिकाणी होणाऱ्या स्पर्धेला जाणार की नाही. तसेच मी लस घेतली की नाही, हे जाहीर करणार नाही. ही खासगी बाब असून अशा पद्धतीची चौकशी करणे अयोग्य आहे, असं मत नोव्हाक जोकोव्हिच मांडलं आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अशा खासगी गोष्टी उघड करणं अयोग्य असल्याचं काहींनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत नोव्हाक जोकोव्हिच ने 9 वेळा ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा जिकंली आहे. अमेरिकेच्या खुल्या पुरूष एकेरी फेरीत पराभव झाल्यामुळे सर्वाधिक 21 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आणि कॅलेंडर स्लॅम जिंकण्याचं स्वप्न जोकोव्हिच अपुरं राहिलं आहे. त्यावळी रशियाच्या डॅनिल मेदवेदेवनकडून नोव्हाक जोकोव्हिचा पराभव केला होता.

थोडक्यात बातम्या-

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! प्रियंका गांधींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् चक्क डेव्हिड वार्नरने केला रोहित शर्मावर चोरीचा आरोप!

‘जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ’; सदाभाऊ कडाडले

अयोध्या दौऱ्यानंतर भाजप-मनसे युतीची शक्यता; राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

‘मी राजीनामा देतोय पण, माझं मन…’; बाबुल सुप्रियोंच्या सेकंड इनिंगची सुरूवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More