प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालचा गंभीर अपघात

मुंबई | गायक जुबिन नोटियालनं(Jubin Nautiyal) एका पेक्षा एक अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सध्या तरूणाईचा जुबिन हा आवडता गायक आहे. तसेच शेरशहा(Shershaah) चित्रपटातील त्यानं गायलेलं ‘राता लंबिया’ हे गाणं तर प्रचंड लोकप्रिय ठरलं. परंतु नुकतीच जुबिनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

नुकताच जुबिनचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुबिन त्याच्याच घरात शिडीवरून घसरून पडला आहे. त्यामुळं त्याला दुखापत झाली आहे. आता त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घसरून पडल्यामुळं त्याचं कमरेच हाड मोडलं आहे. त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. त्याच्या उजव्या हाताचे ऑप्रेशन केले जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच त्याच्या दातावरही शस्रक्रिया केली जाणार आहे.

जुबिनच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जुबिन लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना देखील करत आहेत.

जुबिनला आणि योहानाला गुरूवारी गाण्याच्या लाॅन्चच्या वेळी स्पाॅट करण्यात आलं होतं. परंतु शुक्रवारी त्याच्या अपघाताची बातमी ऐकताच सर्वांना धक्का बसला आहे. त्याच्या प्रकृतीबाबत सध्या चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जुबिनला काही दिवसांपूर्वी ट्रोलींगचा सामनाही करावा लागला होता. तो ज्या कार्यक्रमात गाणं गाणार होता, त्याचा आयोजक गुन्हेगार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळं त्याला विरोध केला जात होता.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More