Sushil Walmik Karad | सरपंच संतोष देशमुख हत्या आणि 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड आता एका नव्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना आता त्याच्या मुलावर देखील एका महिलेने अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्यावर महिलेने सोलापुरात तक्रार दाखल केली आहे. यामुळे वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Sushil Walmik Karad)
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी सुशील कराडविरोधात सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरकडून जबरदस्ती बल्कर ट्रक, कार, प्लॉट आणि सोने ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. इतकंच नाही तर, मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून सुशील कराडने लूट केल्याचा देखील आरोप आहे.
नेमकं घडलं काय?
सुशील वाल्मिक कराड आणि त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेचा पती सुशील कराड याच्याकडे काम करत होता.सुशील कराड हा त्याला कायम म्हणायचा की तू इतके पैसे कसे कमावले, तुझ्याकडे इतक्या गाड्या कशा आल्या, अशी सतत विचारणा करत मारहाण करत होता. इतकंच नाही तर, तिघांनी मॅनेजरचे राहतं घर आणि जागा अनिल मुंडे याच्या नावावर करुन घेतली. (Sushil Walmik Karad)
तसेच पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे लुटले. यानंतर त्या पीडित महिलेने वाल्मिक कराडची देखील भेट घेतली होती. सततची मारहाण आणि रिव्हॉलव्हरच्या धाकाला कंटाळून पीडित महिला व तीचे कुटुंब सोलापुरात आले.
सुशील कराडविरोधात तक्रार दाखल
याचदररम्यान सुशील कराडने परळीत पीडित महिलेच्या मुलीला मारहाण केली. आता त्या पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. यावर आता 13 जानेवारीरोजी सुनावणी होणार आहे. आता मॅनजरच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Sushil Walmik Karad)
News Title : Serious allegation against Sushil Walmik Karad
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत, बंदुकीचा धाक दाखवून…
देशभर जाळं असलेल्या ‘या’ मल्टीस्टेटवर ED ची कारवाई
प्रवाशांसाठी गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन आता कळणार थेट मोबाईलवर
सरपंच हत्येपूर्वी वाल्मिक कराडने घुलेसोबत…; आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर
धक्कादायक!पिस्तूल साफ करताना स्वतःवरच झाडली गोळी, आमदाराचा जागीच मृत्यू