Dhananjay munde | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde ) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माजी मंत्री शालिनी पाटील (Shalini Patil) यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
माजी मंत्री शालिनी पाटील या काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारं पत्र लिहिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पत्र लिहून अनेक मोठे खुलासे केल्याचं समोर आलं आहे. यात त्यांनी अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे (Dhananjay munde) आणि छगन भुजबळ यांच्यावरही तोफ डागली आहे.
शालिनी पाटील यांनी पत्रात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे 100 लोकांना जमवून बाहेरून नर्तकी आणायचे. आणि ही सर्व मिळून घरात नर्तकीचे कार्यक्रम करायचे, असा आरोप शालिनी पाटील यांनी केला आहे. त्यांच्या आरोपामुळे धनंजय मुंडे (Dhananjay munde) आता मोठ्या अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
यासोबतच त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही आरोप केले आहेत. छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाचा मोठा घोटाळा केल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे मूळ नाव जनसंघ आहे मग त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणजेच भारतीय नाव वापरायचा अधिकार कोणी दिला?, असा सवालही शालिनी पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप
शालिनी पाटील यांनी धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यावरही आरोप केले आहेत. अजित पवार यांनी तब्बल 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असून भाजपने तो घोटाळा लपवला आहे. फडणवीस यांनी हा घोटाळा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर बँकेतील 25 हजार कोटींचा घोटाळा युतीसाठी झाकला असल्याचं शालिनी पाटील म्हणाल्या आहेत.
यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी खूपदा भेटण्यासाठी वेळ मागितला. पण, त्यांनी मला कधीच वेळ दिला नाही. राज्यातील एकही मुख्यमंत्री माझ्यासोबत असे वागले नाही. एकनाथ शिंदे यांचे ही वागणे अतिशय चुकीचे असल्याचे शालिनी यांनी म्हटले. एकंदरीत शालिनी पाटील यांनी राज्यातील सत्तेत असणाऱ्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्या या सर्व खुलास्याची आता चर्चा रंगू लागली आहे.
News Title- Serious allegations against Dhananjay Munde
महत्त्वाच्या बतम्या-
Shahrukh Khan | ‘तेव्हाच कानाखाली…’; मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुखचं मोठं वक्तव्य
Sharad Mohol | मुळशीतच झालं होतं प्लॅनिंग, शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर
Rohit Pawar Talathi Bharti l बापरे! हा बडा नेता रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार