बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांवरच गंभीर आरोप

मुंबई | भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या चर्चेत आहेत. किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासुन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांचा धडाका लावला आहे. अशातच स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कलमे यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुकेश दोषी यांची क्रिस्टल प्राइड आणि आनंद पंडित यांची लोटस डेव्हलपर्स या व्यावसायिकांसाठी किरीट सोमय्या काम करत आहेत. त्यांच्याकडूनच किरीट सोमय्या यांच्या संस्थेला मोठया प्रमाणात निधी मिळत असल्याचा धक्कादायक आरोप प्रवीण कलमे यांनी केला आहे.

गृहनिर्माण विभागातील एस आर ए आणि म्हाडा या संस्थेमध्ये काम करणाऱ्यांना बिल्डर लोकांकडून 1000 कोटी रूपये वसूल करण्याचे आदेश मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. आव्हाडांनी तसा आदेश प्रवीण कलमे यांना दिला असून कलमे हे सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता कलमे यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, अर्थ या स्वयंसेवी संस्थेने शिवडीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात सोमय्या यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचं कृत्य केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तर भारतीय दंड संविधान 500 अंतर्गत दंडनीय गुन्ह्याची सुनावणी चालू करण्याचे आदेश दिले आहेत.  त्यासोबतच मंत्र्यांवर आरोप करणारे सोमय्या आपल्या जवळच्या बिल्डर लोकांचं नुकसान टाळण्यासाठी शांत असल्याचं कलमे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

आरसीबीचा ‘वाघ’ एबी डिव्हिलियर्सचं वादळी शतक, गोलंदाजांना भरणार धडकी, पाहा व्हिडीओ

महात्मा गांधींना RSSच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या?- राहुल गांधी

राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख

‘राष्ट्रवादी पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा नाही तर…’; सुरेखा पुणेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार काढणार अध्यादेश

….म्हणून श्रीपाद छिंदमला पुन्हा अटक, ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More