बाळाला सेरेलॅक खाऊ घालताय?, अगोदर ही धक्कादायक माहिती नक्की जाणून घ्या

Nestle Cerelac | भारतासह अनेक देशांमध्ये पालक आपल्या लहान बाळाला सेरेलॅक खाऊ घालतात. पण, याबाबत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नेस्ले कंपनीचे प्रसिद्ध उत्पादन सेरेलॅक आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

सेरेलॅक याची कंपनी गरीब तसंच मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अनैतिक आणि अनुचित व्यवहार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरी संस्था पब्लिक आय (Nestle Cerelac) आणि आयडीएफएएन यांच्याकडून नेस्लेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी

पब्लिक आय आणि आयडीएफएएनने (Nestle Cerelac) कंपनीच्या दोन प्रसिद्ध उत्पादनांमध्ये साखरचा अतिवापर करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्याचं प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात होतं.

काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, याच्या प्रॉडक्टमध्ये अति साखर वापरल्याने जगभरातील बालकांच्या जीवनावर परिणाम झाले आहे.जागतिक नागरी संस्थांकडून याबाबत धक्कादायक अहवाल देखील देण्यात आले होते. त्यामुळे नेस्लेने हा प्रकार बंद करायला हवा, असं जागतिक नागरी संस्थाने म्हटलं होतं.

सेरेलॅक लहान बाळांसाठी घातक?

भारतात मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या सर्व कंपन्यांच्या उत्पादनांची फॉर्म्युला तपासली जाते. नेस्लेवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांच्याकडून भारतातील उत्पादनांमधील साखरेचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी केल्याचं सांगण्यात आलं होतं.

नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि (Nestle Cerelac) व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण यांनी सेरेलॅक नियमांनुसार त्यांची उत्पादने विकत असून भारतात विक्री होत असलेल्या त्यांच्या उत्पदनांमध्ये नियमांपेक्षा खूपच कमी प्रमाणात साखरेचा वापर केला जातो, असं सांगितलं होतं. एप्रिल महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. आता पुन्हा कंपनीवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

News Title – Serious allegations against Nestle Cerelac Company

महत्त्वाच्या बातम्या-

भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक बाजारात लाँच; किंमत काय असणार?

निलेश लंके वादात अडकणार?; कुख्यात गुंड गजा मारणेची भेट स्वीकारली

सुनेत्रा पवारांना खासदारकी देणं ही घराणेशाही नाही का?, छगन भुजबळ थेट म्हणाले…

अजित पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला; थेट..

शरद पवार गट ‘तब्ब्ल’ एवढ्या जागांवर निवडणूक लढवणार; जयंत पाटलांनी सांगितला आकडा