बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर होतं’; नुसरत जहांचे पतीवर गंभीर आरोप

कोलकाता | अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहां यांचं लग्न अवघ्या दोन वर्षात मोडलं आहे. यासंदर्भात खुद्द नुसरत जहां यांनी घोषणा केली आहे. तसेच पती निखिल जैनवर गंभीर आरोप केले आहेत.

नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न 19 जून 2019 ला तुर्कितल्या बोद्रममध्ये झालं होतं. मात्र हे नातं संपल्याची घोषणा करण्याची वेळ नुसरत जहां यांच्यावर आली आहे. नुसरत जहां आणि निखिल जैन यांचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. तुर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हे दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं लग्न होतं. त्यामुळे ते स्पेशल मॅरेज एक्टनुसार नोंद होणं गरजेचं होतं. पण ते कधीच झालं नाही, असं नुसरत जहां यांनी म्हटलंय.

तुर्कीच्या कायद्यानुसार हे लग्न नसून ते एक रिलेशिनशिप होती. फार फार तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येईल. त्यामुळे तलाक  घेण्याचा प्रश्नच नाही, असं खासदार नुसरत जहां यांनी म्हटलंय.

तो व्यक्ती स्वत:च्या श्रीमंत होण्याचे दावे करतो आहे. तसंच त्याचा वापर केल्याचाही तो आरोप करतो आहे. पण वास्तव उलटं आहे. कारण खुप काळापासून माझ्याच अकाऊंटमधून बेयकादेशीरपणे तो पैसे काढतो आहे. माझ्यापासून वेगळं झाल्यानंतरही त्या व्यक्तीनं (निखिलनं) रात्री-मध्यरात्री माझ्या अकाऊंटमधून पैसे काढले आहेत. मी याबाबत पोलीसात तक्रार केलेली आहे, असं नुसरत जहां यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या- 

रेल्वे रूळ की नदी?, पहिल्या पावसात मुंबईची झाली तुंबई, पाहा व्हिडीओ

आश्चर्यकारक! ‘या’ महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म

खुशखबर! लॉकडाऊननंतर फक्त 72 रूपयांमध्ये ‘या’ ठिकाणी राहायची सोय

कौतुकास्पद! कोरोना काळात उपासमार होणाऱ्या 500 माकडांना पोलिस हवलदाराची मदत

ड्रामा क्वीन राखी सावंत बारीक होण्यासाठी करतीये प्रचंड मेहनत, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More