बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला मनसुख हिरेन व्हायचं नाही’; व्यावसायिकाचा परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई | 2017 मध्ये ठाणे खंडणी विरोधी पथकाने आपल्या दोन गाड्या जबरदस्तीने नेल्या. या गाड्यांचा उपयोग करुन अनेक गुन्हे घडलेत. मला हिरेन मनसुख व्हायचं नाही. म्हणून मी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास विरार पोलिसांकडे आलो. मात्र, पोलिसांनी माझी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विरारमधील व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी केला आहे.

परमबीर सिंग आणि अँटेलियाबद्दल जे प्रकरण सुरु आहे त्याविषयी वर्तमानपत्रात माहिती येते आहे. त्याप्रमाणेच 2017 मध्ये माझ्या दोन गाड्या पोलिसांनी जबरदस्तीने नेल्या होत्या. त्यावेळी ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग होते. याशिवाय खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी म्हणून राजकुमार कोथिंबीरे होते. त्यांनीच माझ्या दोन गाड्या नेल्या होत्या, असं मयुरेश राऊत यांनी सांगितलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

माझ्या पत्रात मी मला पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी केलीय. पोलीस तक्रारीतील परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथिंबीरे यांची नावं वाचून हे आमच्या अखत्यारीत येत नाही, आमच्याकडे या पॉवर्स नाहीत, असं सांगत मला माघारी पाठवलं, असंही मयुरेश राऊत यांनी सांगितलं.

माझ्यावर झालेल्या अत्याचारावर मला न्याय हवा आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास करावा. गुन्ह्यात किती सत्यता आहे हे तुम्हाला तपासातच कळेल. साधा अर्ज घेतानाही पोलीस त्यांच्याकडे पॉवर नसल्याचं सांगतात. मग ते गुन्ह्याचा तपास काय करणार?, असा सवाल मयुरेश राऊत यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

‘सगळे पुरूष एक सारखेच असतात’; शाहीदची पत्नी मीराने सांगितली त्याची वाईट सवय

दिलासादायक! पुण्यात नव्याने कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा 4000 हून अधिक डिस्चार्ज, वाचा आजची आकडेवारी

“भाजपने पोटदुखीचा इलाज करावा आणि भाजपशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडं लक्ष द्यावं”

क्रीडा विश्वावर शोककळा! भारताच्या दोन सुवर्णपदक विजेत्या ऑलिम्पिकवीरांचं कोरोनामुळे निधन

अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीने देश कोरोनामुक्त होण्यासाठी ठेवले पूर्ण रोजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More