बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या सूनेचे क्रिकेटर इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध’; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

नवी दिल्ली |  भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणवर अहमदाबाद पोलीस दलातून निवृत्त झालेल्या सय्यद इब्राहिम या पोलीस अधिकाऱ्याने धक्कादायक आणि गंभार आरोेप केले आहेत. याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

माझ्या सूनेचे इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध आहेत. ती त्याच्याबरोबर झोपते आणि ती हे सर्व तिच्या तोंडून सांगेत. 8 दिवसांपासून माझ्या मुलावर दबाव आणत आहे की, जस चालू आहे तसं चालू दे, आम्ही पोलिसांना रेकॉर्डिंगही दिले पण आमचं कोणी ऐकून घेत नाही. इरफान पठाणने मोठ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला. सध्या आमची अशी परिस्थिती आहे की आम्हाला आत्महत्या करावी वाटत आहे, असं सय्यद इब्राहिम यांनी म्हटलं आहे.

इब्राहिम यांच्या सुनेने 11 मार्च, 2021 ला त्यांच्या पूर्ण कुटुंबाविरोधात हुंडा मागितल्याची तक्रार दिली. त्याप्रकरणावर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. त्यावर इब्राहिम यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. माझ्या सुनेचे इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध आहेत, असं म्हटलं आहे. याबाबत दैनिक भास्करने वृत्त दिलं होतं.

दरम्यान, इरफान आणि माझ्या पत्नीचे लग्नापूर्वीच अनैतिक संबंध होते. माझी पत्नी इरफान पठाणची चुलत बहिण लागते. ते दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखतात. इरफान पठाण माझ्या पत्नीला गुपचूप फिरायलाही नेत होता. ते दोघेही व्हिडिओ कॉलवर नेहमी बोलत असतात, असं इब्राहिम यांच्या मुलाने म्हटलं आहे. यावर इरफान पठाण काय स्पष्टीकरण देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं केल्याचा दावा, डॅाक्टरवर गुन्हा दाखल

‘हिन्दुस्तानी भाऊ’ला पोलिसांनी घेतलं ताब्यात, जाणून घ्या कारण; पाहा व्हिडीओ

जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ म्हणण्याची वेळ आली- राधाकृष्ण विखे पाटील

प्रेयसीचा गळा चिरुन खून, हळदीला बसलेल्या तरुणाला अटक, हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

आनंदाची बातमी! कोरोनावर आणखी एका औषधाला मंजुरी, ऑक्सिजनची गरज होणार कमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More