बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग’; NIAचे वाझेंवर गंभीर आरोप

मुंबई | सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

चिन वाझेंनी अंबानींच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा आरोप करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडे हस्तांतरीत केलं जातं. याच प्रकरणी एनआयए कसून तपास करत आहे. वाझेंवर फसवणूक, विस्फोटकांशी निष्काळजीपणा बाळगणे, बनावट मोहर बनवणं आणि धमकी देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. तसेच तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तसेच  NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचं बोललं जात आहे.

सचिन वाझेंनंतर आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

अभिनेत्री सायली संजीवचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?

“सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे”

राजस्थानवरून आलेल्या त्या 180 वऱ्हाड्यांनी वाढवलं पालघरचं टेंशन; इतक्या जणांना कोरोनाची लागण

‘…हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत’; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More