बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार’; पेट्रोलियम मंत्र्यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक त्रस्त आहेत. कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. अशात केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाढत्या इंधन दरवाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. पेट्रोल-डिझेल 100 पार आणि इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय.

काँग्रेसने 2014 पूर्वी ऑईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज सोडलं, त्यामुळे आता आपल्याला मूळ रक्कम आणि व्याज भरावं लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचं एक प्रमुख कारण आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आपल्या आवश्यक असणारे 80 टक्के तेल बाहेरून आयात करावे लागते, असं देखील धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही एका मुलाखतीत बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीचं वेगळंच कारण सांगितलं होतं. मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर 35 हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. त्यामुळे आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत, असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

कडक सॅल्युट! बोट तुटलं तरीही ‘तो’ सामना खेळायला मैदानात उतरला

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार – नाना पटोले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून 24 तासांत जितेंद्र आव्हाडांची नाराजी दूर; काढला हा तोडगा

उंदराने डोळे कुरतडलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू!

“विरोधी पक्ष नक्की कोठे आहे?, पवारांनी फक्त आस्वाद घेण्याचं काम केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More