बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…सगळ्यांनी मिळून हे षडयंत्र रचलं होतं’; 12 आमदार निलंबनप्रकरणी फडणवीसांचा हल्लाबोल

पणजी | सर्वोच्च न्यायालयाकडून 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. त्यातच आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या दौऱ्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

न्यायालयाने सुनावणीच्या वेळी हे निलंबन अवैध असल्याचं म्हटलं आहे. एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे. जी या निर्णयामुळे लागली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने वेळीच आमदारांच्या विनंतीला मान दिला असता तर विधानसभेची अब्रु वाचली असती, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

माझं स्पष्ट मत आहे की, अशा प्रकारचं निलंबन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सहमतीशिवाय झालेलं नाही. सगळ्यांनी मिळून हे षडयंत्र रचलं होतं, असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. नावं ठरवून, जे लोक यात येत नाहीत त्यांना यात टाकून, जे जास्त विरोध करत आहेत. कोण बोलतयं, कोण जास्त संघर्ष करतयं त्यांची नाव ठरवून त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री, वरिष्ठ मंत्री या सगळ्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे हे सर्वजण याला जबाबदार आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! नितेश राणे न्यायालयासमोर शरण, म्हणाले…

भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर राऊतांची नाराजी, म्हणाले….

राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र ‘मास्क फ्री’ होणार का?, ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

लस घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मेडिकलमध्येही मिळणार ‘या’ दोन लस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More