बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात राडा; फडणवीसांनी केले गंभीर आरोप

मुंबई | मुंबईतील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात अद्याप तपास यंत्रणांना यश आलेलं नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अधिवेशनादरम्यान मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी चांगलेच ताशेरे ओढले.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्ज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवला. त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच माझ्या पतीचा खून केलेला असू शकतो. असा संशय व्यक्त केल्याचंही बोलून दाखवलं आहे. मृत्यूच्या काही दिवसापूर्वी मनसुख हे सचिन वाझे यांच्या संपर्कात होते आणि मनसुख हिरेन यांची चौकशी वाझे यांनीच केली असल्याचं मनसुखने आपल्या पत्नीला सांगितलं होतं असा दावा त्यांच्या पत्नीने केला असल्याचंही या अर्जात म्हटलं आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत सचिन वाझेंविरोधात सबळ पुरावे असतानाही त्यांच्यावरती कोणतीही कारवाई का केली गेली नाही? आणि त्यांना तात्काळ अटक का करण्यात आली नाही? असा प्रश्न सभागृहात विचारला. सचिन वाझेंवर कलम 201 अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

सचिन वाझे यांच्याविरोधात एवढे पुरावे असतानाही कलम 201 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे यामागे नेमकं कोण आहे? आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? याचा शोध घेतला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलुन दाखवलं. तसेच मनसुख हिरेन यांची हत्या त्यांच्या गाडीतच करून मग ती गाडी खाडीमध्ये फेकून देण्यात आल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या –

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण!

एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोन तरूणांनी उचललं धक्कादयक पाऊल!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत!

‘…म्हणून इंधनाच्या कार वापरणार नाही’; नितीन गडकरींनी वळवला इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा

महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर पार्थ पवार, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More