बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सतेज पाटलांनी लाखोंचं मुद्रांक शुल्क बुडवून सरकारची फसवणूक केली”

कोल्हापूर | माजी महापौर सुनील कदम यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. सतेज पाटलांनी लाखोंचं मुद्रांक शुल्क बुडवलं असल्याचा आरोप केला आहे. सतेज पाटलांच्या डीवायपी समूहाने 18 लाखांचा मुद्रांक शुल्क बुडवला असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सरकारचं उत्पन्न बुडवणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही कदम यांनी केली आहे.

कोल्हापुरातील शेतकरी संघाची जागा 27 कोटी 87 लाख रूपयांनी पुण्यातील काकडे बिल्डरने विकत घेतली होती. त्यानंतर पालक मंत्री सतेज पाटील यांच्या ज्ञानशांती अॅग्रो फार्म्स लिमिटेड या कंपनीने तीच जागा विकत घेतली. जागा खरेदीतील सह खरेदीदारांनी आपापसात वाटणी करताना सरकारचे 18 लाख 22 हजारांचे मुद्रांक शुल्क बुडवले असल्याचा आरोप सुनील कदम यांनी केला आहे.

या प्रकाराची तक्रार केल्यानंतर मुद्रांक अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी केली आणि यात पालकमंत्री सतेज पाटलांनी सरकारची फसवणूक केल्याचं सिद्ध झालं असल्याचंही सुनील कदम म्हटले आहेत. इतकंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी सतेज पाटलांना 54 लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली असल्याचा दावाही कदमांनी केला आहे. सतेज पाटलांनी दबाव आणून मुद्रांक शुल्क चुकवल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.

सतेज पाटलांना आलेल्या नोटीसीनुसार त्यांना दंडाची रक्कम ही सात दिवसांत भरावी लागणार आहे. मुद्रांक शुल्क बुडवल्या प्रकरणी सतेज पाटलांना दरमहा 2 टक्के याप्रमाणे 2021 संपेपर्यंत 54 लाख रूपये वसुला आदेश काढला आहे. तर सतेज पाटलांनी सयाजी हॉटेलची जागा ही 100 रूपयांच्या स्टँपवर घेतल्याचा धक्कादायक आरोपही सुनील कदम यांनी केला.

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! नव्या वर्षात पुणे मेट्रो सेवेत दाखल होणार

T20 World Cup: पाकिस्तानची जोरदार हॅट्रिक, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सनं मिळवला विजय

संपुर्ण राज्यात गाजत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सुरूवात

‘यावेळी गद्दारी सहन करणार नाही’, नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना भर सभेत खडसावलं

आता ‘या’ प्रवाशांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची मागणी झाली मान्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More