बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानवर पुन्हा संकट! संयुक्त राष्ट्र संघाने दिला ‘हा’ गंभीर इशारा

न्युयॉर्क | तालिबानने बंदुकीच्या आणि हिंसक वृत्तीमुळं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा सर्व प्रदेश हस्तगत केला आहे. त्यामुळं अफगाणी नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे. अफगाणिस्तानमध्ये भूक आणि बेरोजगारीच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. अफगाणिस्तानमधील तब्बल 2 कोटी 20 लाखपेक्षा नागरिकांना तीव्र अन्न सुरक्षिततेचा सामना करावा लागण्याची शक्यता संयुक्त राष्ट्र संघाने वर्तवली आहे.

येणाऱ्या हिवाळ्यामध्ये अफगाणिस्तानात लाखो अफगाणी नागरिकांना स्थलांतर आणि भुकमारीसारख्या समस्यांपैकी एका समस्याचा पर्याय निवडण्यास भाग पाडलं जाण्याची शक्यता वर्ल्ड फूड प्रोग्रामचे संचालक डेव्हिड बीस्ले यांनी सांगितलं आहे. अशा परिस्थितीत जीवन रक्षण सहाय्य वाढवण्याची गरज भासणार आहे, असं अधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच हे संकट येमेन आणि सीरियापेक्षा गंभीर असण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानमध्ये जगातील सर्वांत वाईट मानवतावादी संघटनेचा धोका आहे. देशातील नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. अफगाणिस्तान उद्धस्त होण्याच्या मार्गावर असून, जर ताबडतोब काही ठोस पावलं उचलली नाहीत, तर मोठ्या गंभीर संकटांचा सामना अफगाणिस्तानला करावा लागणार आहे. याआधी 1980च्या दशकात अफगाणिस्तानच्या लोकांवर भूकमारीचं संकट उद्भवलं होतं.

दरम्यान, याआधीच अफगाणिस्तानला आपल्या अंतर्गत गृहयुद्धातून संघर्ष करावा लागत आहे. त्यातच आता देशासमोर उपासमार, बेरोजगारीसह आर्थिक नियोजनाचा फटका सारख्या समस्येतून जात आहे. या सर्व गोष्टींवर संयुक्त राष्ट्र संघाकडून गंभीर इशारा दिला गेला आहे.

थोडक्यात बातम्या –

“देवेंद्र फडणवीसांच्या काळात कायद्याचा धाक होता, तेव्हा…”

“भाजप व्हायरसविरोधात ममता बॅनर्जी नावाची लस प्रभावी”

‘मी आणि समीर दोघेही हिंदू आणि आम्ही…’; क्रांती रेडकरचं मलिकांना प्रत्युत्तर

समीर वानखेडेंना मोठा धक्का! ‘या’ प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली

“गरिबाच्या घरचे दिवे विझवून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केलाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More