“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याची योजना होती”
मुंबई | राज्यासह देशात कोकणातील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण गाजत होतं. भाजप आमदार नितेश राणेंवर अनेक दिवस अटकेची टांगती तलवार कायम होती. न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर आता नितेश राणेंनी तेव्हाच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना मला कोल्हापूरच्या शासकीय दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेल्यापासून डाॅक्टरांसह मोठा फौजफाटा त्याठिकाणी तैनात करण्यात आला होता. मला डाॅक्टरांनी सिटी एन्जोग्राफी करण्याचा सल्ला दिला पण मी नाकारला, असं राणे म्हणाले आहेत.
मला रूग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं सांगितलं की माझ्या अंगात शाई टाकून मला मारण्याचा डाव आहे, असं खळबळजनक वक्तव्य राणेंनी केलं आहे. त्या कर्मचाऱ्याच्या सल्ल्यामुळं मी एन्जोग्राफी केली नाही, असं राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, नितेश राणे सध्या संतोष परब हल्ला प्रकरणात जामीनावर आहेत. माझ्या अटकेसाठी वारंवार कलानगर भागातून फोन येत होता, असं म्हणत राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांची भेट घेणार”
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा पेनड्राईव्ह बॉम्ब, म्हणाले…
“तेच मूर्ख, तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते”
‘ये डर होना जरूरी है’, चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना खोचक टोला
“मुंबईचा विचार फक्त सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला”
Comments are closed.