बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींच्या पायाला गंभीर दुखापत; तर प्रशांत किशोर सोशल मीडियात ट्रेंडमध्ये

नवी दिल्ली |  पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप स्वत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला. आपल्या गाडीजवळ 4 ते 5 जण आले आणि त्यांनी दरवाजा बंद केल्याने आपल्याला जोरदार मार लागला, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. हे बातमी येताच सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर प्रशांत किशोर , ममता बॅनर्जी आणि #Natanki ट्रेंड सुरु झाले.

ममता बॅनर्जी यांचा एमआरआय करण्यात आला. त्यात त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याला, पायला दुखापत झाली आहे. तसंच त्यांच्या उजव्या खांद्याला, हाताच्या कोपराला आणि मानेजवळही दुखापत झाली आहे. त्यांना छातीत दुखत आहे. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्यांना 48 तास देखरेखी खाली ठेवण्यात येत आहे, अशी माहिती एसएसकेएम हाॅस्पिटलचे डाॅक्टर एम. बंडोपाध्याय यांनी दिली आहे.

मुंख्यमंत्री ममता बॅनर्जींचे रणनीतीकार प्रशांत किशोर हे ट्वीटरवर ट्रेंडवर होते. युजर्स वेगवेगळे ट्वीट करत होते. ममता बॅनर्जींसोबत जे काही घडलं ते सर्व नियोजित होतं आणि निवडणूक जिंकण्यासाठी प्रशांत किशोर हे सर्व डावपेच खेळत आहेत, असं सोशल मिडिया युजर्स म्हणत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्यावरील या हल्ल्याचा आरोप भाजपवर केला आहे. आपल्याविरोधात कट-कारस्थान रचून हल्ला केला गेला, असा आरोप ममतांनी केला. तर पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ममतादीदींच्या जवळही कोणी जाऊ शकत नाही. तरीही संशय असेल तर सीबीआय चौकशी करावी. ममतांचे हे नाटक आहे. असं कैलास विजयवर्गीय यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांची चिंता वाढली; आजपासून कठोर निर्बंध

“सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लावण्याचा विचार- मुरलीधर मोहोळ

दीड वर्षाच्या मुलाच्या पोटात आढळला मृत गर्भ, पुण्यातील ‘या’ रूग्णालयात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More