बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावल्यास राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे.

राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते. पण लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. अशात तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यमुळे राज्यासमोरील चिंतेत वाढ झाली आहे.

देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर सर्वांचं लसीकरण हाच पर्याय आहे. अशात लसीकरणाचा वेग मंदावल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे, असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

राज्यात आतापर्यंत 1.5 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र एवढ्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण करण्यास 1 मे पासून आवश्यक लसी उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरीपर्यंत लसी कदाचित मिळू शकतात. त्यावेळी लसीकरण सुरु होऊ शकतं, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. तेवढी सुविधा राज्यात उपलब्ध आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ!

“देशातील जनतेला मूर्खात काढलं जातंय, सरकारविरोधात जनतेने बंड पुकारलं पाहिजे”

कोरोनाने मुलगा हिरावला, 15 लाखांची FD मोडून मेहता दाम्पत्याने केली कोरोना रूग्णांना मदत

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More