मुंबई | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर कमी होत आहे. मात्र कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंटनं जगाची चिंता वाढवली आहे. अनेक देशांमध्ये कोरोना रूग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याची माहिती आहे. डेल्टाक्रॉन (Deltacron) हा कोरोना विषाणूचा नविन प्रकार समोर आला आहे.
डेल्टाक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटपासून निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. डेल्टाक्रॉन व्हेरिएंटमुळे एक व्यक्ती एकाच वेळी ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित होते. या व्हायरसमध्ये दोन भिन्न प्रकारची जीन्स आहेत. शास्त्रज्ञ या प्रकाराला रिकॉंम्बिनंट म्हणतात.
डेल्टाक्रॉन व्हेरिएंटचा ज्या प्रमाणात जास्त प्रसार होतो तितक्या प्रमाणात व्हायरसमध्ये बदल होतो. डेल्टाक्रॉन व्हेरिएंटमुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही. दोन व्हायरसच्या कॉम्बिनेशनमुळे नवीव व्हेरिएंट निर्माण होण्याचा धोका देखील असतो. रिकॉंम्बिनंट संदर्भात अधिकची माहिती मिळवण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
दरम्यान, WHO कडून डेल्टाक्रॉन व्हेरियंटची पुष्टी करण्यात आली आहे. प्राण्यांना डेल्टाक्रॉन व्हेरिएंटची लागण होत आहे. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी प्राण्यांना देखील या विषाणूची लागण होत असल्याचं म्हटलं आहे. लोकांमध्ये डेल्टाक्रॉन जास्त प्रमाणात पसरू शकतो. कोरोना महामारी अजून पुर्णपणे संपलेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
Corona: कोरोनाच्या वाढत्या शिरकावामुळे ‘या’ ठिकाणी चिंतेचं वातावरण
“काही वर्षांपूर्वीच कोकणातील घाण आपण पळवून लावली”
‘आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला’; अन्यथा…
जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! फक्त 10 रूपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड वॅलिडिटी आणि…
Comments are closed.