बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सीरम’ने काहीही करून महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्यावं”

मुंबई | केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. 1 मेपासून लसीकरणाता टप्पा चालू करणार होते मात्र लसी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण सध्या बंद आहे. लवकरात लवकर लसीकरण चालू व्हावं यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली सीरम इन्स्टिट्यूटला एक विनंती केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ही महराष्ट्रात पुण्यात आहे त्यामुळे अदर पूनावाला यांनी लस देण्याच्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसं झुकतं माप द्यावं, अशी विनंती राजेश टोपे यांनी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना टोपेंनी ही विनंती केली.

कुठल्याही पद्धतीने आम्हाला लसीकरण 18 ते 44 असेल, यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे आणि जून महिन्यात असलायला हवं. जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं लसीकरण करता येईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरमयान, लस उपलब्ध नसल्याने, आपल्या जवळ निधी आहे आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण उपलब्ध नसल्याने आज आपल्याला 18 ते 44 वयोगाटातील लसीकरण ते कमी गतीनं करावं लागत असल्याचं टोपे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याबाबत तात्याराव लहानेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

भारतात कोरोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे- सुंदर पिचाई

“बीसीसीआयने 700-800 कोटींची मदत करावी, देशाला उपकाराची परतफेड करण्याची वेळ”

अवघ्या 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबेंचं कोरोनानं निधन!

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More