मनोरंजन

‘मी सुशांत सरांना गांजाचं सेवन करताना पाहिलं होतं’; नोकर दीपेशचा खुलासा

मुंबई | नोकर दीपेश आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान दीपेशने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

सुशांत गांजाचं सेवन करत होता असा खुलासा दीपेशने केल्याचं कळतंय. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलंय. सुशांतला 2018 मध्ये गांजाचं सेवन करताना पाहिल्याचं दीपेशने सांगितलं आहे.

मी सुशांतसाठी कधीच गांजाची खरेदी केली नाही. अब्बास खालोई हा सुशांतसाठी चरस आणि गांजा तयार करत असून ते दोघं एकत्रच ड्रग्सचं सेवन करायचे, असं दीपेशने सांगितलं आहे.

रियाचा भाऊ शोविकच्या सांगण्यावरून दीपेशने अमली पदार्थ विकत घेतल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर दीपेश आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

‘मला महाराष्ट्र आवडतो’; कंगणा राणावतचं मराठीत ट्विट

“छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणं हा महाराजांचा अपमान आहे”

सरकार देशातील सर्व पेट्रोल पंपावर लवकरच चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या विचारात…!

आचार्य अत्रेंच्या कन्या प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन

“महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या