बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोड बोलण्यासाठी तिळगूळाची गरज नाही, आमचा कारभार उघड आहे”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांनाही चांगलंच सुनावलं.

सरकारच्या कामाबाबत नेहमी प्रश्न केला जातो. तिळगूळ द्यावा लागतो असं म्हटलं जातं. मात्र गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही, लोकांची फक्त साधी कामं असतात. पण अनेकवेळा प्रशासनाकडून उत्तर मिळत नाही. त्यांना उत्तर मिळालं पाहिजे. त्यासाठी ही सुविधा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

आम्ही काही लपवत नाही. आमचा कारभार उघड आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. महापालिका नेमकी काय आहे, काय कामं करते हे जनतेला समजलं पाहिजे. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी तंत्रज्ञान, सोशल मिडिया आणि मोबाईलच्या वापर आणि सामान्य नागरिकांना होणारा फायदा याबद्दल आपलं मत मांडलं. मुंबई महानगरपालिका सर्व सामान्यांचं आयुष्य सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असेल, तर ही कौतुकाची बाब असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

पुढील 2-3 दिवस राज्यात थंडीचा जोर कायम, हवामान खात्याचा इशारा

मोठी बातमी! अजित पवारांच्या नावाने धमकीचा फोन, मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

Makar sankranti 2022: ओमिक्राॅनविरोधात रोगप्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी तिळाचे लाडू सेवन करा

Omicron पासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

कोरोना झालेल्या मुलासोबत महिलेनं केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More