बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशनाची तारिख ठरली; ‘या’ तारखेपासून नागपूरात होणार अधिवेशन

मुंबई | नुकतंच मुंबईत विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं आहे. हे अधिवेशन पुर्णपणे वादळी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज काही मर्यादित वेळेत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात आता येत्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे हे अधिवेशन देखील नागपूरात होणार आहे. पण या हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आता चालू झाल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे.

कोरोना संसर्गामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै असे दोन दिवस पार पडले आहे. गोंधळाच्या स्थितीत देखील या दोन दिवसांत विधानसभेचे 10 तास 10 मिनिटे कामकाज झाले. तर गोंधळामुळे कामकाजाचा 1 तास 25 मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती मिळाली आहे. या दोन दिवसात सभागृहात 12 विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 9 विधेयके संमत झाली आहेत.

दरम्यान, विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनात एकूण चार शासकीय ठराव मंजूर झाल्याची माहिती उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन भाजपने आपल्या खिशात घातलं होतं. तर पावसाळी अधिवेशन महाविकास आघाडीनं  आपल्याकडे वळवलं आहे. त्यामुळे आता येत्या 7 डिसेंबरला अधिवेशनाचं पारडं कोणाकडे झुकतंय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

…तर भाजपचे 12 नव्हे, 18 आमदार निलंबित झाले असते- अजित पवार

‘पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा’; दरेकरांचा गंभीर आरोप

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या परिक्षेच्या तारखा जाहीर

“दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More