बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तारीख ठरली! ‘या’ तारखेला होणार हिवाळी अधिवेशन

पुणे | राज्य विधीमंडळच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना याबाबतची घोषणा केली. येत्या 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

येत्या 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी सर्व कामकाज उरकून घ्या, असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली असली तरी अधिवेशन नेमकं कुठे होणार आहे, याबाबत अजित पवारांनी माहिती दिली नाही.

सगळे प्रस्ताव तयार करा आणि माझ्याकडे मंजुरीसाठी पाठवा. आम्ही त्यावर विचार करून लवकरात लवकर पारित करण्याचा विचार करू, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रथेप्रमाणे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतलं जातं. पण मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आलं होतं. आता मात्र कोरोना कमी होत असल्यानं हिवाळी अधिवेशन नागपुरातच होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा चाहतीला बसला मोठा धक्का! कोमात गेली तरुणी अन्…

पंजशीर जिंकल्याचा आनंद लहान मुलांच्या जिवावर बेतला; हवेत केला गोळीबार अन्…

RSSला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे – जावेद अख्तर

मोदींचं मिशन काश्मीर! एक दोन नव्हे तर तब्बल 70 मंत्री करणार जम्मू काश्मीरचा दौरा

तब्बल 21 हजार वर्षापूर्वीही होतं कोरोनाचं अस्तित्व; ऑक्सफोर्डच्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More