‘सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा…’; भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
मुंबई | राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे रोज आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळतात. अशातच आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 2024 मध्ये काॅंग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं होतं. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक शब्दांत म्हटलं की, याचं उत्तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला विचारा. ते त्यांच्यासोबत ऊठबस करतात. ते योग्य उत्तर देऊ शकतील.
काही पक्षांचे विचार एक्सपायर झाले आहेत. तरी काही प्रमाणात ते निवडून येतात. पण मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स एक्स्पायर झाला असेल, तर त्यांच्या आसपासचे अधिकारी कसं काम करतात हे दिसून येतं. जर मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स काढला जात नसेल, तर सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं प्रशासन आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
दरम्यान, काॅंग्रेसचा राजकारणातील स्तर हळूहळू घसरु लागला आहे, असंही मुनगंटीवर म्हणाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण जोरदार पेटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘रशियाला 10 दिवस युद्ध थांबवावं लागेल’; माजी लष्कर अधिकाऱ्यानं सांगितलं कारण
होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा काय आहेत नियम
Punjab New Chief Minister: भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा; न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचे ताजे दर
Comments are closed.