नाशिक महाराष्ट्र

सातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण

नाशिक | सातवीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी शिक्षकाबरोबर पळून गेल्याची घटना नाशिकच्या निफाड तालूक्यातील देवपूर येथे घडली आहे. मला सर खूप आवडतात मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे, असं या मुलीने चिठ्ठीत म्हटलं आहे.

मुलीने लिहिलेली चिठ्ठी घरात सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. तातडीने सर्वांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती कुठेच सापडली नाही.

शिक्षक पंकज साळवे यांच्या घरी कुटुंबीय खात्री करण्यासाठी गेले असता त्यांच्या घराला कुलूप आढळलं. यानंतर मुलीच्या आईने शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

शिक्षकाने मुलीबरोबर प्रेम संबंध निर्माण करुन तो त्यामुलीला घेऊन गेला. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या चिठ्ठीला फारसे महत्व नसल्याचं पोलिस अधिक्षकांच म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

“बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे”

“बाळासाहेबांचा पुतळा उभारलात, आता आनंद दिघेंचाही उभारा”

“राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

शेतकऱ्याच्या मुलीचा 24 तास लावणी करुन नवा रेकाॅर्ड; जन्मदात्यांसह उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू

“दिल्लीतील हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या