अर्थसंकल्पातून राज्यातील सुमारे 12 लाख कर्मचाऱ्यांची निराशा

मुंबई | राज्य सरकार यावर्षी तरी सातव्या वेतन आयोगाची घोषणा करेल, अशी आशा होती. मात्र ती आशा फोल ठरली आहे. 2018-19च्या राज्याच्या अर्थसंकल्पातही सातव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आलेली नाही.

सातव्या वेतन आयोगाची घोषणा न केल्यामुळे राज्यातील सुमारे 12 लाख कर्मचारी निराश झाले आहेत. या कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, बक्षी आयोगाच्या अहवालानंतर सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली जाणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.