मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. वर्षाच्या सुरवातीपासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे.
राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसकर यांनी हिवळी अधिवेशनामध्ये याबाबतची घोषणा केली होती. त्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाला आहे.
या निर्णयामुळे सरकाच्या तिजोरीला तब्बल 21 हजार कोटींचा भार होणार आहे. या सातवा वेतन आयोगाचा सुमारे 71 लाखांपेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे.
दरम्यान, वेतन आयोग लागू करताना थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री बाजारपेठा सुरु ठेवा- आदित्य ठाकरे
-शिवसेनेच्या चित्रपट सेनेविरोधात गुन्हा दाखल करा- निलेश राणे
-भाजपच्या अडचणीत वाढ; आणखी एक घटक पक्ष नाराज
-कोणावरही एकाच पक्षाचा शिक्का कायम राहत नाही- एकनाथ खडसे
-ठाकरे सिनेमातील त्या संवादामुळे वाद; दाक्षिणात्य कलाकारांनी नोंदवला आक्षेप
Comments are closed.