बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाचा गंभीर इशारा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उष्णतेचा पारा वाढला आहे. वाढणाऱ्या उष्णतेचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि दक्षिणेकडील अंदमान समुद्राकडील भागात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असनी चक्रीवादळाचा देशातील काही राज्यांमध्य़े हवामानावर परिणाम होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांसह अनेक ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ, तामिळनाडू, पद्दुचेरी कराईकल आणि दक्षिण कर्नाटकात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शनिवारी राज्यात सांगली आणि मिरज येथे पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण याठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. यावर्षी हवामानामुळे आंब्याला मोहोर येण्यास उशीर झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काहीप्रमाणात फळे आली होती. जास्त उन्हामुळे कैऱ्यादेखील पिवळ्या पडू लागल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम राजस्थानच्या भागात उष्णतेच्या तीव्र  लाटेची परिस्थिती होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार पाच दिवसांमध्ये विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई?, BMC चा पुन्हा दणका

“शिवसेनेसारख्या पक्षानी महाराष्ट्रामध्ये जातीभेदाचं बीज पेरलंय”

Deltacronचा पुन्हा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी आढळून आले नवे रूग्ण

“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”

“संजय राऊतांचं असं आहे की, दिन मे बोले जय श्रीराम, और रात को लेते सौ सौ ग्राम”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More