बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मॅचपूर्वी SEX करा”, सचिन-द्रविडसह इतर खेळाडूंना मिळाला होता सल्ला

मुंबई | ‘क्रिकेट आणि वाद’ यांचं नातं काही नवीन नाही. मैदानात आणि मैदानाबाहेर बरेच वाद-विवाद रंगलेले दिसतात. आयपीएलमध्येही काही वाद-विवाद पहायला मिळतात. पण हे विवाद मैदानाबाहेरचे जास्त असतात. अशातच आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांच्या लिखाणावरून आता नवा वाद पहायला मिळतोय.

माजी मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन ‘द बेअरफूट कोच’ हे पुस्तक आता चांगलंच चर्चेचा विषय बनत आहे. या पुस्तकातून पॅडी अप्टन यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पॅडी अप्टन यांनी भारतीय खेळाडूंना सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला दिला होता, असं त्यांनी स्वत: त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे.

2009च्या चॅम्पियन ट्राॅफीआधी पॅडी अप्टन यांनी सेक्स करण्याचा सल्ला भारतीय खेळाडूंना दिला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, भारताचा द वाॅल राहुल द्रविड आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांना पॅडी अप्टन यांनी सल्ला दिल्याचं त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

दरम्यान, पॅडी अप्टन यांनी दिलेल्या सल्लाबद्दल त्यांना त्यावेळी माफी देखील मागितली होती. भारतीय खेळाडूंना असा सल्ला देणं ही आपली चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. आता या पुस्तकामुळे आता काय नवीन खुलासे होतात. याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर पुन्हा Lockdown लावलं जाऊ शकतं”, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

“1 लाख जण अंगावर आले तर काय कराल?”, राज ठाकरेंचा सवाल

लग्नात जोरदार एन्ट्री करणं पडलं महागात; घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

“चौकीदारला आपलं ट्विटर अकाऊंट वाचवता येत नाही, देश काय वाचवणार?”

ST Strike | “लोकांवर अरेरावी करण्यासाठी हे राज्य तुमच्या हातात दिलं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More