Top News क्राईम देश महाराष्ट्र मुंबई

सेक्स कॉल… अभिनेते, नेते, खेळाडूंना मोठा धोका; पोलिसांची धडक कारवाई

Photo Courtesy- Pixabay

मुंबई | आधी एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते… ती अॅक्सेप्ट केल्यानंतर काही दिवसांनी ती मुलगी तुम्हाला हाय…हॅलो…करते, मग हळूहळू ती तुमच्यासोबतचं संभाषण आणखी वाढवते. व्हॉट्सअप नंबरची देवाणघेवाणही करते. व्हॉट्सअपवरही बोलणं सुरु करते. रोज मेसेज तर करतच असते. समोरच्याला आपल्या प्रेमाची कबुली देऊन त्याच्यासोबत सुरु असलेला संवाद अधिक रोमॅन्टिक वळणावर नेते आणि एकेदिवशी असं काही घडतं की आपण लाखो-करोडो रुपयांना लुटलो गेलो याची जाणीव संबंधित व्यक्तीला होते.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक असून त्यामुळे भल्याभल्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या टोळक्याने बाॅलिवूड अभिनेते, राजकीय नेते, खेळाडू, व्यावसायिक यांना ब्लॅकमेल करण्यासाठी एक दोन नव्हे तर 171 फेक फेसबुक प्रोफाईल बनवले होते, तसंच 5 फेक इन्स्टाग्राम अकाऊंट देखील उघडले होते.

फसवणुकीसाठी वापरलेले 54 मोबाईल फोन देखील मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने जप्त केले आहे. तसंच खंडणीची रक्कम या टोळक्याने विविध 58 बॅंक खात्यांमध्ये घेतली होती. ही 58 बँक खाती देखील मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गोठवली आहेत.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, हे टोळके राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या भागात बसत असे व अनेक धनाड्य लोकांची फसवणूक करत असे. याकरता ते सर्वात आधी बाॅलिवूड अभिनेते, राजकीय नेते, खेळाडू, व्यावसायिक यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा अभ्यास करायचे. विविध पद्धतीने त्यांच्या खात्यांचा रिसर्च झाल्यानंतर त्यातील काही अभिनेते, राजकीय नेते, खेळाडू, व्यावसायिक यांना सुंदर मुलींचे फोटो लावलेल्या फेक प्राफाईलवरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे. त्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या ट्रिक्स वापरुन पुरते जाळ्यात ओढायचे आणि त्याच्याकडून खंडणी वसूल करायचे.

नेमकी कशी होते फसवणूक-

-फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते

-रिक्वेस्ट एक्सेप्टकरुन हळू हळू सोशल मीडियावरच ओळख वाढवली जाते

-एके दिवशी ती सुंदर मुलगी फेसबुक मॅसेंजरवर मेसेज करतो आणि चॅटिंग सुरु होते

-एकमेकांचे व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर शेअर केले जातात, त्यानंतर रात्रंदिवस चॅटिंग सुरु होतं.

– एखाद्या मध्यरात्री सुंदर मुलगी अचानक व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ काॅल करते आणि तो व्हिडिओ काॅल उचलताच ती निवस्त्र होऊन अश्लिल चाळे करते

-लाईव्ह काॅल असल्याने त्या सुंदर मुलीला अश्लिल चाळे करताना पाहून समोरील व्यक्तीही तिच्याशी तशाप्रकारे अश्लील चाळे करु लागतो

-काही तासात त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एक फोन येतो. तू माझ्या पत्नीसोबत, मुलीसोबत किंवा आईसोबत अश्लिल चाळे केलेत आणि तुला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, माझ्याकडे तो व्हिडीओ आहे अशी धमकी देतो.

-त्याच नंबरवरुन नंतर त्या अश्लील कृत्याचा व्हिडीओ देखील पाठवला जातो. व्हिडीओ काॅलमध्ये पीडित व्यक्ती जे हावभाव करते ते हावभाव असलेल्या चेहऱ्याचे व्हिडिओ कट करुन माॅर्फिंग केलेलं असतं.

-असा व्हिडिओ तयार केला करुन पीडित व्यक्तीकडे खंडणी वसूल केली जाते.

सर्वात जास्त कोण ठरलंय बळी-

पोलिसांच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या मते सर्वात जास्त राजकारणी लोक या टोळ्यांना बळी पडलेले आहेत, त्यासोबतच अनेक राजकीय कार्यकर्ते देखील या प्रकाराला बळी पडले आहेत. त्यानंतर व्यावसायिकांचा नंबर लागतो. काही बॉलिवूड अभिनेते तसेच खेळाडूंना देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे. या टोळीनं आतापर्यंत अशा लोकांकडून कोट्यवधींची माया जमवल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?, ‘या’ माणसाचा सल्ला मोदी ऐकणार का?

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड काय म्हणाले?, वाचा जसंच्या तसं…

राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची रुपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली

लाईट्स… कॅमेरा… अ‌ॅक्शन…. धाड टाकताच समोरील प्रकार पाहून पोलीसही हादरले!

कोरोना नेत्यांची पाठ सोडेना, आता ‘या’ बड्या नेत्याचीही टेस्ट पॉझिटिव्ह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या