बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नाचं आमिष दाखवून ठेवलेले लैंगिक संबंध बलात्कार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कटक |   ओडीशा उच्च न्यायालयाने एक महत्तपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाचं आमिष दाखवून ठेवलेले लैंगिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाही, असा मोठा निर्णय ओडिशा उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाने हा निर्णय देत असतानाच कनिष्ठ न्यायालयाने संबंधित तरूणाला 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्याचा आदेश रद्द ठरवला आहे. ओडीशा (कटक) उच्च न्यायालयाचा हा खूप मोठा निर्णय म्हणाला लागेल.

कायद्यानुसार जर एखाद्या तरूणाने खोटे आश्वासन देऊन महिलेशी शारिरीक संबंध ठेवले तर त्याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक होऊ शकते. परंतू जी. अच्युत कुमार प्रकरणात न्यायमूर्ती पानीग्राही यांनी बलात्काराचा कायदा शारिरीक संबंधामधील गुन्ह्यात सरसकट वापरता येऊ नये. विशेष करून ज्यावेळी महिलेने शारिरीक संबंध स्वच्छेने ठेवलेले असतील, असं म्हणत जी. अच्युत कुमारच्या 2019 ला 19 वर्षाच्या मुलीचा बलात्कार प्रकरणी जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, या पुढच्या काळात न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचा दूरगामी परिणाम होणार आहे. यापुढच्या अनेक खटल्यांमध्ये कटक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विचार केला जाऊ शकतो.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

आपल्या घामाने महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा ठाकरे सरकार छळ करतंय- योगी आदित्यनाथ

महत्वाच्या बातम्या-

सूचना केल्यावर राजकारण समजत असाल तर तुम्ही गैरसमजात रहा; फडणवीसांचं उद्धव यांना प्रत्युत्तर

काही राज्यांनी वाईट वागणूक दिलीये, आता उ. प्रदेशचे कामगार हवेत तर परवानगी घ्यावी लागणार- योगी आदित्यनाथ

आम्ही भर पुरात मदतीला धावलो आहे अन् आताचे मुख्यमंत्री घरात बसून आहेत- गिरीश महाजन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More