Davos | दावोस (Davos) येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum – WEF) पाच दिवसीय वार्षिक बैठकीत भारताने जागतिक उद्योजकांकडून २० लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या गुंतवणुकीसाठी (Investment) आश्वासने मिळवण्यात यश मिळवले आहे. यातील ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा (Maharashtra) आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी पाच केंद्रीय मंत्री आणि तीन मुख्यमंत्र्यांसह या बैठकीत भारताचे नेतृत्व केले. मात्र, या बैठकीसंदर्भातील एका धक्कादायक वृत्ताने खळबळ उडाली आहे.
सेक्स पार्ट्यांचे काळे सत्य उघड
डेली मेल डॉट सीओ डॉट यूके (dailymail.co.uk) मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी आलेल्या जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांकडून सेक्स पार्ट्या (Sex Parties), वेश्या (Prostitutes) आणि ट्रान्सजेंडर महिलांना (Transgender Women) प्रचंड मागणी होती. एस्कॉर्ट एजन्सीजने (Escort Agencies) हा धक्कादायक खुलासा केला आहे. सोमवारी सुरू झालेल्या या बैठकीसाठी जगभरातील ३,००० हून अधिक उद्योगपती आणि राजकीय नेते उपस्थित होते.
सेक्स ‘महफिल’ सजवण्यासाठी कोट्यवधींची उधळण
टिट४टॅटचे (Titt4Tat) प्रवक्ते अँड्रियास बर्गर (Andreas Burger) यांनी मेलऑनलाइनला (MailOnline) दिलेल्या माहितीनुसार, “डब्ल्यूईएफच्या सुरुवातीपासूनच, आम्ही दावोस आणि जवळपासच्या प्रदेशात सुमारे ३०० महिला आणि ट्रान्स महिलांना बुक होताना बघितले आहे.” याची तुलना २०२४ मध्ये बुक झालेल्या अंदाजे १७० महिलांशी केली जाऊ शकते. (Davos)
लिया मॉडेल्स एस्कॉर्ट एजन्सीच्या (Lia Models Escort Agency) जान आणि लिया यांनी म्हटले आहे की, WEF सारख्या मोठ्या आयोजनात सर्वसामान्यपणे एस्कॉर्ट्सची मागणी वाढते. कारण जगभरातून अनेक उच्च-श्रेणीतील पाहुणे येत असतात. यामुळे WEF साठी दावोसमध्ये एस्कॉर्ट्सचे येण्याचे मुख्य कारण पैसा कमविणे होते.
या कार्यक्रमासाठी जगभरातील श्रीमंत व्यक्ती येतात, जे कोणत्या ना कोणत्या कंपनीचे मालक अथवा सीईओ (CEO) असतात. काही महिला त्यांच्याकडून प्रति बुकिंग £६,००० (अंदाजे ९ कोटी रुपये) एवढे कमावतात.
अनेक एजन्सीज हे मान्य करतात की, ही रक्कम श्रीमंत ग्राहकांसाठी काहीच नाही आणि त्यांचे क्लायंट महिलांच्या काही तासांच्या ‘सोबत’साठी एवढे पैसे सहज मोजतात. Titt4Tat’s बर्गरने म्हटले आहे की, WEF मध्ये सरासरी बुकिंग कालावधी चार तासांचा आहे. जो सरासरी प्रतितास दर आणि WEF च्या पहिल्या तीन दिवसांदरम्यान Titt4Tat वर ३०० बुकिंगसह एकत्रितपणे सुमारे CHF३००,००० (£२७०,०००) एवढा होता. (Davos)
Title: sex parties at world economic forum davos high demand for prostitutes and transgenders