Top News कराड महाराष्ट्र

“संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील”

कराड | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अद्याप समोर आलेले नाही. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. या प्रकरणावर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राठोड कधी समोर येणार?  या प्रश्नाचं उत्तर आता गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलं आहे. संजय राठोड हे सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. योग्य वेळ येताच ते माध्यमांसमोर येतील, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्रकारांनी संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन की सर्व पत्रकार तुमची आत्मितयेतेने वाट बघत आहेत. त्यांची एकदा भेट घ्या, असं मिश्किल उत्तर अजित पवारांनी दिलं.

या प्रकरणात पोलीस योग्य तपास करतील आणि सत्य समोर आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. इतकच नाही तर एकेकाळी एखादा आरोप झाल्यावर लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा द्यायचे. पण आता तो काळ राहिला नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी!

कोरोनामुळे ‘या’ शहरात पुन्हा कडक निर्बंध, अंत्यविधीला फक्त 20 जण तर हॉटेल्स…

राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार सरकारलाच नडला, गुन्हा दाखल झाला पण शिवजयंती साजरी केलीच!

कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय पण प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहानेंनी दिली दिलासादायक माहिती

लाल महालासमोर गायला पोवाडा, या प्रसिद्ध शाहीराला पुण्यात अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या